शिवसेनेचा बालेकिल्ला पोखरण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना टाळी

राज ठाकरे यांनी भाजपला कडवा विरोध करताना भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली. मात्र, राज यांची राजकीय खेळी वेगळी असल्याचे चित्र दिसून आले. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 14, 2018, 06:24 PM IST
शिवसेनेचा बालेकिल्ला पोखरण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना टाळी title=

मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला कडवा विरोध करताना भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली. मात्र, राज यांची राजकीय खेळी वेगळी असल्याचे चित्र दिसून आले.  राज्यात नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे भाजपने राज ठाकरे यांच्या मनसेला टाळी दिल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि मनसे युती झाल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत मनसेनेने आपले खाते उघडले. देवरुख नगरपंचायतीमध्ये आता मनसेचा एक नगरसेवक असणार आहे. तसेच भाजपने ही निवडूक जिंकून शिवसेनेला जोरदार धक्का देत पुन्हा ही नगरपंचायत आपल्याकडे राखण्यात यश मिळविलेय. त्यामुळे भाजप-मनसे युतीमुळे मनसेला नगरपंचायतीमध्ये सत्तेत स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राजकारणातील नवी समीकरणे

प्रभाग १२ मधून मनसेच्या उमेदवार सान्वी संसारे (मनसे) २२९ यांनी शिवसेनेच्या उमेदवार दीक्षा शेट्ये (१५७) यांचा पराभव केला. या ठिकाणी भाजपने आपला उमेदवार दिला नव्हता. तसेच काँग्रेसच्या रिया शेट्ये (२९) आणि अपक्ष सोनिया धामणसकर (१३०) रिंगणात होत्या. भाजप-मनसे युतीमुळे येथे शिवसेनेला जोरदार धक्का देण्यात भाजप यशस्वी झाले. तसेच भाजपला विजय मिळवून देण्यात मनसेचा हातभार लागल्याने राजकारणातील नवी समीकरणे देवरुख नगरपंचायतीमध्ये दिसून आलीत.

राज ठाकरे यांची भूमिका

छाया - वैभव खेडेकर यांच्या फेसबूक वॉलवरुन

देवरूख नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मृणाल अभिजीत शेट्ये यांचे अभिनंदन मनसेचे नेते आणि  खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले. मनसे पक्ष वाढीसाठी जातीने वैभव खेडेकर प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडे कोकणची जबाबदारी देण्यात आलेय. तसेच राजापूर येथील नाणार प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांनी जातीने लक्ष घातलेय. त्यांनी या प्रकल्पाला विरोध करताना आम्ही ग्रामस्थांच्या पाठिशी आहोत, असे स्पष्ट केले. त्यामुळे मनसे आपली पाळेमुळे ग्रामीण भागत रुजविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे या निवडणुकीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते, असा संदेश मनसेने या निवडणुकीतून भाजपशी युती करुन दिलाय.

मनसेच्या मतदार संख्येत वाढ

तर दुसरीकडे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपने कंबर कसली असून आता मनसेसी मागे नाही, हेच या युतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. मनसे-भाजप युतीमुळे शिवसेनेच्या अनेक जागा कमी मतांनी हातच्या गेल्यात. अनेक ठिकाणी मनसे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिलाय.  तर मनसेतून शिवसेनेत गेलेले प्रमोद कदम यांना या पराभवाचा धक्का बसलाय. भाजप उमेदवारांने त्यांचा पराभव केलाय. या ठिकाणी मनसेने आपला उमेदवार दिला नव्हता. तर  प्रभाग क्रमांक ११ मध्ये  माजी नगराध्यक्षा निलम हेगशेट्ये यांना मनसेमुळे पराभवाचा धक्का बसलाय. मनसे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर राष्ट्रवादीच्या प्रेरणा पुसाळकर यांनी बाजी मारली. या ठिकाणी भाजपने आपला उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे भाजपने पद्धतशील शिवसेनेला संपविण्यासाठी मनसेशी हातमिळवणी केली होती, हेच या निवडणुकीतून दिसून येत आहे.

भाजपविरोधात राणेंचा 'स्वाभिमान'

मनसे चार ठिकाणी आपले उमेदवार दिले होते. त्याठिकाणी शिवसेनेला जोदार टक्कर दिली. मनसे त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे मनसेची युतीकरुन भाजपला चांगला फायदा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप ८ आणि मनसे १ अशी मिळून ९ ही सत्ताधाऱ्यांची नगरपंचायतीमध्ये संख्या असणार आहे. त्यामुळे मनसेला सत्तेत स्थान मिळण्याचे संकेत मिळत आहेत. थेट नगराध्यक्ष निवडणुकीच भाजपने विजय संपादन केलाय. मृणाल शेट्ये या २४३५ मतांनी विजयी झाल्यात. त्यांनी शिवसेना उमेदवार धनश्री बोरुकर यांचा पराभव केलाय. या निवडणुकीत भाजप विरोधात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार उभा होता. त्यामुळे येथील राजकारण चांगलेच ढवळून निघाल्याचे पाहायला मिळाले. 

 अंतिम निकाल 

 नगराध्यक्षपद निकाल -

१ ) सौ. स्मिता लाड (राष्ट्रवादी) १९८१ 

२ ) सौ. धनश्री बोरुकर (शिवसेना) २३१६ 

3) सौ. मृणाल शेट्ये (भाजप) २४३५

४) सौ. मिताली तळेकर (स्वाभिमान) ३६४ 

५) सौ. अनघा कांगणे (अपक्ष) ३७७ 

प्रभागनिहाय निकाल

प्रभाग १ -

१) प्रकाश मोरे (शिवसेना)१८० 

२)संदीप वेलवणकर (भाजप)१५७ 

३ )देवेंद्र पेंढारी (राष्ट्रवादी)८५ 

४ )संजय परकर (स्वाभिमान) ३५ 

प्रभाग २ -

 १)अक्षता मुंडेकर (शिवसेना)१०० 

 २) आश्‍विनी पाताडे (भाजप)१९०

 ३)वैष्णवी कांगणे  (काँग्रेस)८४ 

४) कल्पना केसरकर (अपक्ष ) ६२ 
 
प्रभाग ३ -

 1) सुवर्णा शिंदे (शिवसेना)१५३ 

 2) रेश्मा किर्वे (भाजप)१७७

 3)दिपाली करंडे (राष्ट्रवादी)१४५ 

 4)श्रध्दा भोसले (अपक्ष)१० 

 प्रभाग ४ -

 1) वैभव पवार (शिवसेना)३१४ 

 2)कुंदन कुलकर्णी (भाजप)४६ 

 3)गणेश मोहिते (राष्ट्रवादी)१४९ 

प्रभाग ५ -

1)बबन बांडागळे (शिवसेना)१०८ 

 2) संतोष केदारी (भाजप) २६१ ९१ 

3) युयुत्सु आर्ते (जनता दल) 

प्रभाग ६  -

 1)मानस जागुष्टे (शिवसेना)१२१ 

 2)सुधीर यशवंतराव (भाजप)७३ 

 3) प्रफुल्ल भुवड (राष्ट्रवादी) २३१ 

4)अण्णा बेर्डे (अपक्ष)०४ 

 5)सौ.संगिता हातीसकर (स्वाभिमान) १६ 

प्रभाग ७ -

 1)दत्ताराम कांगणे (शिवसेना)१२१ 

 2) सुशांत मुळ्ये (भाजप) २४१

 3)अनिल भुवड (काँग्रेस)५८ 

 4)तेजश्री मुळ्ये (अपक्ष)०३ 

प्रभाग ८  -

 1) अनुष्का टिळेकर (शिवसेना)१९७ 

 2)निकिता रेवाळे (भाजप)21 

3)स्नेहा वेल्हाळ (काँग्रेस)१३६ 

प्रभाग ९  -

 1)मेघा बेर्डे (शिवसेना)८३ 

 2)निकिता रहाटे (भाजप)१०० 

 3) प्रतिक्षा वणकुद्रे (काँग्रेस)१२० 

 प्रभाग १० -

 1)जयंत चव्हाण (शिवसेना)१०८ 

 2)गिरीष भोंदे (मनसे)१२९ 

 3) उल्हास नलावडे (राष्ट्रवादी) १५०

 4)अमोल सुर्वे (स्वाभिमान)२९ 
५) सुरेश बने (अपक्ष) १६ 

प्रभाग ११-

  1)निलम हेगशेट्ये (शिवसेना) ८० 

2)आस्था कोचिरकर (मनसे) १३२ 

3) प्रेरणा पुसाळकर (राष्ट्रवादी) १४८

प्रभाग १२ -

 1) दीक्षा शेट्ये (शिवसेना) १५७ 

2) सान्वी संसारे (मनसे) २२९ - विजयी

 3) रिया शेट्ये (काँग्रेस) २९ 

4) सोनिया धामणसकर (अपक्ष) १३०

प्रभाग १३  -

 1) प्रमोद कदम (शिवसेना)१४४ 

 2)  वैभव कदम (भाजप)२१८

 3) शाम कदम (राष्ट्रवादी)११५ 

 प्रभाग १४  -

 1) संपदा खवळे (शिवसेना)१६९

2) धनश्री आंबेकर (भाजप)१८५ 

 3)पुजा सुवारे (राष्ट्रवादी) १२२ 

प्रभाग १५  -

 1)  निदा कापडी (शिवसेना)२४७ 

 2) पुजा मांगले (मनसे)६५ 

 3) रुक्साना बोदले (राष्ट्रवादी) ३१ 

4) प्रणाली विंचू (अपक्ष)४५ 

प्रभाग १६ -

1) विलास केदारी (शिवसेना)८० 

2) राजेंद्र गवंडी (भाजप)१०९ 

3) वसंत तावडे (राष्ट्रवादी) ८७ 

4) दीपक खेडेकर (अपक्ष) 89

5) सुरेंद्र पांचाळ (स्वाभिमान)१९ 
 

प्रभाग १७ बिनविरोध

वैभवी पर्शराम