'नागपुरातला गुन्हा राष्ट्रीय गुन्हा ठरतो'

राज्याचा गृहमंत्री असल्याने नागपुरात एकही गुन्हा घडला की तो राष्ट्रीय गुन्हा ठरतो

Updated: Sep 3, 2017, 09:24 PM IST
'नागपुरातला गुन्हा राष्ट्रीय गुन्हा ठरतो'  title=

नागपूर : राज्याचा गृहमंत्री असल्याने नागपुरात एकही गुन्हा घडला की तो राष्ट्रीय गुन्हा ठरतो, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नागपूर पोलिसांना क्लिन चीट दिलीय. खरं तर गेल्या काही महिन्यांमध्ये नागपूरमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढलीय मात्र नागपूर पोलिसांच्या कामगिरीचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे, शिवाय इतर शहरात देखील पोलिसांच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यात येईल असेही ते म्हणाले.

सीसीटीव्ही यंत्रणेमुळे मुंबईतील पूरावेळी परिस्थिती नियंत्रणासाठी चांगलाच उपयोग झाला.  पुणे आणि मुंबई मध्ये स्ट्रीट क्राईम मध्ये कमी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पोलीस यंत्रणा स्मार्ट करण्यावर भर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पोलीस कारभारात सूसुत्रता यावी आणि नागरिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी तयार केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.