परभणीत लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

परभणीमध्ये एक लाखाची लाच स्वीकारताना उपजिल्हाधिकारी सापळ्यात सापडला. 

Updated: Feb 20, 2018, 10:32 PM IST
परभणीत लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याला रंगेहाथ अटक  title=

परभणी : परभणीमध्ये एक लाखाची लाच स्वीकारताना उपजिल्हाधिकारी सापळ्यात सापडला. 

सुदर्शन सूर्याजी गायकवाड असं या लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याचं नाव आहे. पाझर तलावात संपादित केलेल्या जमिनीचा 'मावेजा' म्हणजेच मोबदला मिळवून देण्यासाठी अहवाल पाठवण्याकरता, सुदर्शन गायकवाडनं एक लाखाची लाच मागितली होती.

गायकवाडच्या दालनातच लाच स्वीकारताना एसीबीनं त्याला रंगेहाथ अटक केली.