भाजप आमदाराला खंडणीचा मेसेज; दिली अशी धमकी

गुगल पेवर पैसे देण्याची मागणी धमकी देणाऱ्या आरोपीने केलीय

Updated: Sep 25, 2022, 04:58 PM IST
भाजप आमदाराला खंडणीचा मेसेज; दिली अशी धमकी title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune) भाजप (BJP) आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना खंडणीसाठी (extortion) धमकावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पैसे न दिल्यास माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांचे दिर बाबा मिसाळ यांना ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. माधुरी मिसाळ आणि बाबा मिसाळ यांना मोबाईलवर मेसेज (Message) करून दोन आणि पाच लाख रुपयांची मागणी (extortion)  करण्यात आली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे.

बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणी इमरान समीर शेख (रा. 79, विकास नगर, घोरपडी गाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांनी बाबा मिसाळ यांच्या मोबाईलवर तसेच माधुरी मिसाळ यांनी जनसंपर्कासाठी दिलेल्या मोबाईलवर मेसेज केले. मेसेज करुन त्यांनी गुगल पे द्वारे दोन ते पाच लाख रुपयांची वारंवार मागणी केली. पैसे न दिल्यास मिसाळ यांना ठार मारण्याची धमकी दिली. 

आरोपी इमरान समीर शेख दररोज मेसेज करून मिसाळ यांना त्रास देत होता. याआधीही शेख यांच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. याबाबत बोलताना मिसाळ यांनी आपण तक्रार केलेली असून तपास पोलीस करतील असं म्हटलं आहे.