मन:शांतीसाठी केजरीवाल इगतपुरीत

 मानसिक संतुलन स्थीर व टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रकृती स्वास्थ चांगले राहावे यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून केजरीवाल विपश्यनेस आले आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 12, 2017, 08:44 AM IST
मन:शांतीसाठी केजरीवाल इगतपुरीत title=

घोटी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ध्यान साधनेसाठी इगतपुरीत येथील विपश्यना विश्व विद्यापीठ येथे सोमवारी झाले आहेत. 

अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आणखी दोन साधकही शिबिरात दाखल झाले. त्यामध्ये स्वाती मालीवाल, वंदना सिंग या दोघींचा समावेश आहे. या दोन्ही महिलांना साधक कक्ष मिळाला, तर केजरीवाल यांना पॅगोडा क्रमांक दोन जवळील साधक कक्ष क्रमांक तीनमध्ये शिबिर कक्ष देण्यात आल्याची माहीती समोर येत आहे. 

मानसिक संतुलन स्थीर राहण्यासाठी

राजकीय घडामोडी तसेच जनसेवेचा तणाव यातून काही वेळ मानसिक संतुलन स्थीर व टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रकृती स्वास्थ चांगले राहावे यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून केजरीवाल यांनी विपश्यना साधना करण्याचे ठरवले आहे, असे त्यांच्या सेक्रेटरी व निकटवर्तीयांनी सांगितले.

इतर साधकांप्रमाणेच

विपश्यना करताना केजरीवाल यांच्यासाठी कोणतीही वेगळी सुविधा, सुव्यवस्था नसणार आहे. त्यांचा वावर हा सर्वसामान्य साधकांप्रमाणेच असणार आहे. दरम्यानच्या काळात त्यांना कोणालाही भेटता येणार नाही आथवा मोबाइलचाही वापर करता येणार नाही.