ऐतिहासिक! अल्पवयीन मुलींवर अत्याचारप्रकरणी दोघांना फाशी

ठाणे न्यायालयाने महिला दिनाच्या दिवशी ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

Updated: Mar 8, 2019, 04:19 PM IST
ऐतिहासिक! अल्पवयीन मुलींवर अत्याचारप्रकरणी दोघांना फाशी title=

ठाणे : ठाणे न्यायालयाने महिला दिनाच्या दिवशी ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी दोन आरोपींना फाशी तर एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहम्मद शेख, रामकिरीत गौंज या आरोपींना फाशीची शिक्षा तर सुमंतकुमार झा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.