टिपेश्वर अभयारण्यात दोरीचा फास पायात अडकल्याने वाघ जखमी

क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून फासे लावणाऱ्या आरोपींचा शोध सुरु आहे. 

Updated: Jun 2, 2019, 10:42 AM IST
टिपेश्वर अभयारण्यात दोरीचा फास पायात अडकल्याने वाघ जखमी title=

यवतमाळ : टिपेश्वर अभयारण्यात शिकारीच्या प्रयत्नात जखमी झालेल्या वाघाला जेरबंद करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहे. रेडीओ कॉलर लावलेल्या T1C3 या वाघाच्या पायात दोरीचा फास अडकल्याने त्याला जखम झाली होती. ही बाब पर्यटकांनी वन्यजीव विभागास निदर्शनास आनून दिली. त्यानंतर तत्काळ त्या वाघाच्या शोधासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. रेस्क्यु ऑपरेशन अंतर्गत वाघाच्या पायातील नॉयलॉन दोरीचा फास काढुन जखमेवर आवश्यक औषधोपचार करण्यात आले.

वाघाचे स्वास्थ चांगले असल्याबाबत खात्री करण्यात आली. त्यानंतर वाघाला शुध्दीवर आणून जंगलात सोडण्यात आले. टिपेश्वर अभयारण्याच्या सिमावर्ती भागात वन्यप्राण्यांच्या मांसाकरीता फासे लावून शिकार करण्याचे प्रकार निदर्शनास आल्याने, संवेदनशिल क्षेत्रात क्षेत्रिय कर्मचा-यांकडुन फासे लावण्याऱ्या आरोपीचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
 
यवतमाळमधील टिपेश्वर अभयारण्यात शिकारीच्या प्रयत्नात जखमी झालेल्या वाघाला जेरबंद करुन त्याच्यावर उपचार करण्यात आले. वाघाच्या पायातील नॉयलॉन दोरीचा फास काढून जखमेवर आवश्यक ते औषधोपचार करण्यात आले आहेत. तसेच क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून फासे लावणाऱ्या आरोपींचा शोध सुरु आहे.