Viral Video: धावत्या बसमध्ये तात्या विंचू सारखा धोकादायक प्रवास; वसईतील व्हिडिओ व्हायरल

Vasai Viral Video:  वसई विरार महानगर पालिकेच्या परिवहन सेवेचा बोजवारा प्रवासीच चव्हाट्यावर आणत असल्याचा हा प्रकार आहे. या बसचा मागून प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांनी हा धोकादायक प्रवास कॅमेऱ्यात कैद केला आहे. 

Updated: Apr 12, 2023, 10:38 PM IST
Viral Video: धावत्या बसमध्ये तात्या विंचू सारखा धोकादायक प्रवास; वसईतील व्हिडिओ व्हायरल  title=

Vasai Viral Video: महेश कोठारे यांच्या "झापटलेला" या चित्रपटाची लोकप्रियता आजही कायम आहे. या चित्रपटातील प्रमुख खलनायक असलेले तात्या विंचू हे पात्र आजही चर्चेत आहे. तात्या विंचू एसटी बसला लटकून प्रवास करतो असा एक सीन या चित्रपटात आहे. या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वसईत एक व्यक्ती  धावत्या बसमध्ये तात्या विंचू सारखा धोकादायक प्रवास करत आहे.  वसईतील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे वसईच्या परिवहन सेवेचा कारभार देखील चव्हाट्यावर आला आहे.  

वसई विरार महानगर पालिकेच्या परिवहन सेवेचा बोजवारा प्रवासीच चव्हाट्यावर आणत असल्याचा हा प्रकार आहे. या बसचा मागून प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांनी हा धोकादायक प्रवास कॅमेऱ्यात कैद केला आहे. 

वसई विरार परिवहन सेवेच्या बसच्या मागे एक प्रवासी लटकून जीवघेणा प्रवास करत असल्याचा व्हिडिओ दिसत आहे. या दृश्यांमध्ये वसईत परिवहन बसच्या मागे लटकू एक प्रवासी धोकादायक प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. प्रवासी जादा आणि अपुरी परिवहन सेवा असे चित्र विरार वसईत पहायला मिळते. 

वसई - बाफाने मार्गांवर रात्री कामावरून सुटणाऱ्या नागरिकांना घरी जाताना मोठी कसरत करावी लागते. प्रवाशांना बसमध्ये तुफान गर्दीचा सामना करावा लागतो. बस मध्ये चढायला जागा नसते. परिवहन बस शिवाय दुसरी पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेक प्रवासी कोणताही धोका पत्करायला तयार होतात.  बस मध्ये चढायला जागाच नसल्याने एका प्रवाशाने थेट बसच्या मागे लटकून झपाट्लेल्या चित्रपटातील तात्या विंचू सारखा प्रवास केला आहे. ही सर्व दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर सध्या वायरल होतं आहेत.

वसई विरार मध्ये परिवहन सेवेचा बोजवारा

वसई विरार परिसरात  दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. यामुळे प्रवासी संख्या वाढत आहे. वसई विरार शहरात वसई विरार महानगरपालिकेतर्फे परिहवन सेवा पुरवली जाते. मात्र, परिवहन व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. प्रवासी जास्त आणि अपुरी बस व्यवस्था यामुळे प्रवाशांची मोठी गौरसोय होते. बसला तुडूंब दर्दी होत असल्याने अनेक प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी देखील मोठी धडपड करावी लागते.