शिळफाटा येथे प्लास्टिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग

शिळफाटा परिसरात असलेल्या प्लास्टिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग लागली. 

Updated: Feb 13, 2018, 08:52 AM IST
शिळफाटा येथे प्लास्टिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग  title=

ठाणे : शिळफाटा परिसरात असलेल्या प्लास्टिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग लागली. ही आग मध्यरात्रीनंतर लागली. या आगीत सहा ते आठ गोदामं जळून खाक झाली. 

ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.