छोरीया छोरोंसे कम है के... धाकड गर्ल्सची 'दंगल'

Beed Dangal girls : अभिनेता आमिर खान याच्या 'दंगल' सिनेमात धाकड गर्ल्स पाहायला मिळाल्यात.(Dangal girls) त्यांची कुस्तीतील 'दंगल' चर्चेचा विषय झाला होता. आता बीड जिल्ह्यातही 'दंगल'ची पुन्हा एकदा चर्चा पाहायला मिळत आहे.  

Updated: May 3, 2022, 01:38 PM IST
छोरीया छोरोंसे कम है के... धाकड गर्ल्सची 'दंगल' title=

बीड : Beed Dangal girls : अभिनेता आमिर खान याच्या 'दंगल' सिनेमात धाकड गर्ल्स पाहायला मिळाल्यात.(Dangal girls) त्यांची कुस्तीतील 'दंगल' चर्चेचा विषय झाला होता. आता बीड जिल्ह्यातही 'दंगल'ची पुन्हा एकदा चर्चा पाहायला मिळत आहे. फुले पिंपळगावात जंगी कुस्ती स्पर्धा भरविण्यात आली होती. या  कुस्त्यांसाठी पेहेलवानाची तोबा गर्दी दिसून आली. स्पर्धेत कुस्तीत मुलींनी मुलांना आसमान दाखवत अवघ्या 44 सेकंदात कुस्ती जिंकली. (Girls beat boys in wrestling competition at Beed)

रुपाली शिंदे हिने अवघ्या 44 सेकंदात आपल्या विरोधी कुस्ती खेळणाऱ्या मुलाला हरवले आणि आखाड्यात एकच जल्लोष झाला. धाडक गर्ल्स,  दंगल गर्ल्स असा माहोल दिसून आला.  माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथे श्री लक्ष्मी आई यात्रा महोत्सवानिमित्त महाराष्ट्र केसरी असलम काझी यांच्या प्रमुख उपस्थितीत जंगी कुस्त्या साठी पैहेलवानांची तोबा गर्दी झाली होती.

पैहेलवान वैष्णवी सोळंके, रुपाली शिंदे यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. जंगी कुस्त्याच्या दंगलीत हिंगोलीच्या कुमारी पैहेलवान रुपाली शिंदे आणि जालना जिल्ह्यातील मंठा येथील कुमार पैहेलवान वैष्णवी रामकिसन सोळंके यांनी धडाधड पैलवान मुलाना असमान दाखवले.  वैष्णवी सोळंके हिने आखाड्यात योगा दाखवून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारने फेडले .उपस्थितीतांनी या दोघींना बक्षिसे देवून कौतुक केले. रुपाली शिंदे हीन अवघ्या 44 सेकंदात आपल्या विरोधी कुस्ती खेळणाऱ्या मुलाला धूळ चारत सामना जिंकला. या विजयानंतर धाकड गर्ल्सचीच चर्चा होत आहे.