पालघर येथे दहीहंडी फोडताना पडून गोविंदाचा मृत्यू

दहीहंडी फोडताना पडून १८ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. धनसार गावात ही दुर्घघटना घडली. या घनटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

Updated: Aug 15, 2017, 07:52 PM IST
पालघर येथे दहीहंडी फोडताना पडून गोविंदाचा मृत्यू title=

पालघर : दहीहंडी फोडताना पडून १८ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. धनसार गावात ही दुर्घघटना घडली. या घनटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. रोहन किणी असे या गोविंदाचे नाव आहे.

दरम्यान, मुंबईत: दहीहंडीचा जल्लोष असून थरारामध्ये उंचच उंच थर रचण्याच्या नादात अनेक गोविंदा जखमी होत आहेत. आतापर्यंत सुमारे  ४६ हून अधिक गोविंदा जखमी झालेत. एका गोविंदाला गंभीर दुखापत झालेय. त्याला केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेय.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलाय. मुंबईत सकाळपासून दहीहंडी फोडताना आतापर्यंत १८ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  सायन रुग्णालयात ५  गोविंदांना दाखल करण्यात आलं असून त्यांच्या डोक्याला दुखापत झालीय. तर केईएम रुग्णालयात दाखल केलेल्या सात गोविंदांपैकी तिघांची प्रकृती स्थिर आहे. तर राजावाडी रुग्णालयात तीन जणांना दाखल करण्यात आले आहे.

 माँ रुग्णालयात एकाला दाखल कऱण्यात आलंय तर के इ एम रुग्णालयात सकाळपासून अनेक गोविंदावर उपचार सुरु असून अनेकांना उपचार करुन घरी सोडून देण्यात आले आहे.