सचिन अंदुरेला आज पुन्हा न्यायालयात आणणार

आज त्याची सीबीआय कोठडी संपत असल्यानं त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 

Updated: Sep 1, 2018, 08:08 AM IST
सचिन अंदुरेला आज पुन्हा न्यायालयात आणणार  title=

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक असलेल्या सचिन अंदुरेला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सीबीआयनं त्याला औरंगाबादहून अटक केली होती. गुरूवारी त्याच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली होती. या दरम्यान म्हणजे शुक्रवारी सीबीआयनं त्याला घेऊन या प्रकरणाचा तपास केला.

कोठडी संपली 

दाभोलकरांची हत्या झालेल्या ठिकाणीही त्याला आणलं गेलं होतं. आज त्याची सीबीआय कोठडी संपत असल्यानं त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे दाभोलकरांच्या हत्येत सहभागी असल्याच्या संशयावरून कर्नाटक एसआयटीच्या अटकेत असलेल्या गौरी लंकेश प्रकरणातील आरोपी अमोल देगवेकर आणि राजेश बंगेरा यांचा ताबा सीबीआयला मिळालाय. त्यांनाही पुणे न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

दरम्यान गौरी लंकेश प्रकरणातील आणखी एक आरोपी अमोल काळे याला कलबुर्गी हत्या प्रकरणात वर्ग केलेलं असल्यानं त्याचा ताबा सीबीआय मिळालेला नाही.

परस्पर संबंध 

दाभोलकराच्या खूनात अंदुरेसोबत प्रत्यक्ष सहभागी असलेला शरद कळसकर एटीएसच्या ताब्यात आहे. असं असंलं तरी या सगळ्यांचे परस्परांमधील संबंध स्पष्ट झाले असून दाभोलकर हत्येच्या तपासाला खऱ्या अर्थानं गती आलीय. आज न्यायालयात आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.