Cyrus Mistry : सायरल मिस्त्री यांच्या अपघातापुर्वीचा VIDEO आला समोर

सायरल मिस्त्री यांचा शेवटचा VIDEO आला समोर, अपघातापुर्वी सीसीटीव्हीत झाले होते कैद

Updated: Sep 5, 2022, 09:00 PM IST
 Cyrus Mistry : सायरल मिस्त्री यांच्या अपघातापुर्वीचा VIDEO आला समोर  title=

मुंबई : टाटा सन्सचे (tata sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे रविवारी एका रस्ते अपघातात निधन झाले आहे. पारशी धर्मगुरूला भेटण्यासाठी ते गुजरातमधील उडवाडा येथे गेले होते. यावेळी अहमदाबादहून मुंबईला परतत असताना त्यांची कार पालघरजवळ ( Cyrus Mistry car crash) डिव्हायडरला धडकली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर चौकशीचे आदेश (Inquiry) देण्यात आले आहेत. त्यातचं आता अपघातापुर्वीचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. प्रवासाची ही संपुर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे.  

सीसीटीव्हीत काय?
सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) अहमदाबाद ते मुंबईचा प्रवास करत होते. मिस्त्री यांच्यासोबत आणखी तीन लोक उपस्थित होते. अनाहिता पांडोळे, तिचा पती दारियस पांडोले दारियसचा भाऊ जहांगीर पांडोळे ज्या कारमध्ये प्रवास करत होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) रस्त्यावरील भीषण अपघातापूर्वी व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. 

पालघर पोलिसांनी (Palghar police)  दिलेल्या माहितीनुसार, मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईला जात असताना त्यांची कार दुभाजकाला धडकली. अपघाताच्या वेळी कारमध्ये चार जण होते. घटनेच्या वेळी मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्यासह दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

पालघर पोलीस (Palghar police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) ज्या कारमधून प्रवास करत होते, त्या कारचा चालक भरधाव वेगात गाडी चालवत असताना अचानक त्याचे नियंत्रण सुटून ती डिव्हायडरला धडकली. सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा मृतदेह कासा येथील शासकीय रुग्णालयात आहे. पोलिसांकडून प्रक्रियेनुसार अपघाती मृत्यू अहवाल (ADR) दाखल करण्यात येत आहे." 

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी पोलीस महासंचालकांना या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर वरळी येथे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.