नागपुरात गुंडाचा धिंगाणा, तलवारीने बारची तोडफोड

राज्याच्या उपराजधानीत गुंडाचा हैदोस सुरुच आहे. दारु देण्यास नकार दिल्याने बारमध्ये तोडफोड आणि व्यवस्थापकाला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Updated: Nov 30, 2017, 11:40 PM IST
नागपुरात गुंडाचा धिंगाणा, तलवारीने बारची तोडफोड title=

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत गुंडाचा हैदोस सुरुच आहे. दारु देण्यास नकार दिल्याने बारमध्ये तोडफोड आणि व्यवस्थापकाला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

मारहाण सीसीटीव्हीमध्ये कैद 

भवानीनगर भागात काजल बारमध्ये झालेला हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. हातात नंग्या तलवारी घेऊन गुंडांनी बारमध्ये तोडफोड केली. मंगळवारी रात्री ही घटना घडलीये. रात्री अकरानंतर सात तरुण बारमध्ये शिरले आणि दारू मागितली.

तलवारी घेवून धिंगाणा 

बार व्यवस्थापकाने दारु देण्यास नकार दिल्यानंतर गुंडांनी हातात तलवारी घेवून धिंगाणा घातला. यामध्ये व्यवस्थापक अरुण जैस्वाल जखमी झालेत. याप्रकरणी कळमना पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मात्र या घटनेनंतर  व्यापारी आणि परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.