नांदेडमध्ये पतसंस्थेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, घटना CCTVत कैद

तलवार आणि चॉपर घालून सहा जण पतसंस्थेत शिरले आणि... 

Updated: Oct 1, 2022, 06:42 PM IST
नांदेडमध्ये पतसंस्थेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, घटना CCTVत कैद title=

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा पतसंस्थेत सहा दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवत दरोडा (robbery) टाकला. तलवार (sword) आणि चॉपर (Chopper) घेऊन तोंडाला फडका बांधलेले सहा दरोडेखोर पतसंस्थेत शिरले. त्यांनी पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांना तलावारीने धमकावत पतसंस्थेतील दोन लाख रुपयांची कॅश लुटली. 

कॅश (Cash) लुटून हे सहाही दरोडेखोर दुचाकीवरुन पळून जात होते. पण पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी आरडा ओरडा केल्याने आजूबाजूची लोकं धावून आले. त्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग करत एकाला पकलं. तर इतर पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या आरोपीला नागरिकांनी बेदम चोप दिला. नांदेड जिल्ह्यातल्या उमरी तालुक्यातील सिंधी इथं ही घटना घडली.

दरम्यान दरोड्याचा हा सगळा प्रकार पतसंस्थेच्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झालाय. पोलीस दरोडेखोरांचा शोध घेतायत. भरदिवसा दरोड्याची ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.