सांगली हादरली! शाळेसमोरच भरदिवसा भाजप नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

Sangli Crime : भरदिवसा झालेल्या या हत्याकांडामुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. शाळेच्या समोरचा हा सर्व प्रकार घडल्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे

Updated: Mar 17, 2023, 03:36 PM IST
सांगली हादरली! शाळेसमोरच भरदिवसा भाजप नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या title=

Sangli Crime : सांगलीच्या (Sangli News) जत मध्ये भाजप (BJP) नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विजय ताड (Vijay Tad) असे हत्या झालेल्या भाजप नगरसेवकाचे नाव असल्याचे समोर आले आहे. ताड यांची इनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी गाडीवर हल्ला चढवत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. जत मधल्या सांगोला रोडवरील अल्फान्सोइन स्कूलजवळ भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. 

जत नगरपालिकेचे भाजपचे नगरसेवक विजय ताड यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडून ताड यांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नगरसेवक असलेले ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवर असणाऱ्या अल्फान्सो स्कूलमधून मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेले होते. काही अज्ञात लोक त्यावेळी ताड यांच्या गाडीचा पाठलाग करत होते. शाळेजवळ पोहोचताच अज्ञात हल्लेखोरांनी ताड यांची गाडी अडवून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.

अंधाधुंद गोळीबारात विजय ताड यांना गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत. ताड यांच्यावर गोड्या झाडल्यानंतरही हल्लेखोरांनी त्यांचा डोक्यात दगड घातला. या यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या सर्व प्रकारानंतर आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी  तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अल्फान्सो इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शेजारीच ही धक्कादायक घटना घडली. शाळेजवळ पोहोचताच ताड यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. या हल्लामध्ये ताड यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. तर ताड हे त्यांच्या इनोव्हा गाडीपासून 100 फूट अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या शेजारी दगड देखील होता. यानंतर लगेचच घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले. 

यासोबत ताड यांच्या समर्थकांनीही या ठिकाणी मोठे गर्दी केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली हे देखील जतकडे रवाना झाले आहेत.