विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : केज तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबीक कलहातून त्यांच्या सख्ख्या भावाने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.
हल्लेखोरानं वाघ यांच्या मानेवर आणि डोक्यात वार केले. ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, सध्या मात्र जखमी नायब तहसीलदार आशा वाघ यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
केज येथे महसूल विभागाच्या सेवेत असणाऱ्या नायब तहसीलदार आशा वाघ यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ यांचे आपसात कौटुंबिक कलहातून आणि शेतीच्या कारणावरून कौटुंबिक वाद सुरू होता. त्यातच सोमवारी सकाळी मधुकर वाघ (वय ४५) वर्ष रा. दोनडिगर ता. चाळीसगाव जि. जळगाव येथून येऊन केज तहसिल कार्यालयात आला. (crime nayab Tehsildar Asha Wagah attacked with at Tehsil office by her own brother)
आशा तिथं काम करीत बसलेल्या असताना मधुकर वाघ याने अचानक तेथे जाऊन त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने आशा वाघ या घाबरल्या आणि त्यांनी जीव वाचविण्यासाठी शेजारी असलेल्या दुसऱ्या कक्षात पळाल्या.
तहसील कार्यालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनी हल्लेखोर भावाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं.
दरम्यान, आशा यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अंबाजोगाई येथे नेण्यात आलं. पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथे नेण्यात आल्याची माहितीही समोर आली. पुडील उपचार मिळताच वाघ यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तहसील कार्यालयात उपस्थितामुळे वाचले प्राण
नायब तहसीलदार आशा वाघ या आस्थापना विभागात काम करत असताना त्यांच्यावर हल्ला होताच त्या जिवाच्या आकांताने ओरडल्या आणि तिथं असणाऱ्या एका दुसऱ्या कक्षात त्यांनी पळ काढला.
हा प्रसंग पाहताच तिथं असणाऱ्या नागरिकांनी हल्लेखोर मधुकर वाघ याला धरून कोंडून आणि पोलीसांना सदर प्रकरणाची माहिती दिली आणि वाघ यांचा जीव वाचला.