शूज घालून फिरणाऱ्या 'या' कोंबड्याचा व्हिडिओ व्हायरल

गेल्या कित्येक दिवसांपासून कोंबड्यांच्या व्हिडिओंना चांगलीच पसंती मिळत आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 15, 2018, 04:43 PM IST
शूज घालून फिरणाऱ्या 'या' कोंबड्याचा व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून कोंबड्यांच्या व्हिडिओंना चांगलीच पसंती मिळत आहे. 

वेगवेगळ्या कोंबड्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पसंतीला पडत आहे. या व्हिडिओतला कोंबडा चक्क शूज घालून फिरताना दिसत आहे. या व्हिडिओला अधिक पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठचा आहे याबाबत काहीच माहिती मिळत नाही. पण हा व्हिडिओ अधिक व्हायरल होत आहे. 

या आधीपण असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये कोंबडा चक्क आपल्या मालकाला "अण्णा" "अण्णा" अशी हाक मारत आहे. त्याला पकडायला गेल्यावर तो आपल्या मालकाला अण्णा अण्णा अशी हाक मारतो. या अगोदर देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच एक कोंबडा चक्क आपल्या मालकाच्या घराची राखण करताना दिसतो. घरातल्या कुटुंबियांव्यतिरिक्त कुणी असल्यास त्याला घरी न येऊ देता त्यांचा धपाटा धरत असे. 

अशाच पद्धतीचा हा कोंबडा आहे. ज्याने नेटीझन्सची मन जिंकली आहेत. सध्या या कोंबड्याचीच चर्चा आहे.