कसारा रेल्वेचा पादचारी पूल की गुरांचा गोठा?

गाई आणि बैलांनी घेतला पुलाचा ताबा

Updated: Jul 11, 2018, 01:50 PM IST
कसारा रेल्वेचा पादचारी पूल की गुरांचा गोठा? title=

कसारा : मध्यरेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकाचा पादचारी पूल हा रेल्वे प्रवाशांसाठी आहे कि गुरांचा गोठा असा प्रश्न विचारायची वेळ आता आली आहे. कारण या पादचारी पुलाचा ताबा चक्क गाई आणि बैलांनी घेतला आहे. सध्या कसारा परिसरात पाऊस सुरु असल्याने, या पावसापासून आपला बचाव करण्यासाठी ही गुरं पादचारी पुलावर चढून उभे राहतात. त्यामुळे प्रवाशांना आणि लहान मुलांना या पादचारी पुलाचा वापर करतांना भीती वाटते. त्यामुळे हा पादचारी पूल प्रवाशांसाठी आहे का गुरांसाठी असा सवाल प्रवासी रेल्वे प्रशासनाला विचारात आहेत.