Mumbai Covid New Guidelines: कोविडसंदर्भात पालिकेचा Action Plan तयार; पाहा नवीन गाईडलाईन्स

covid 19 guidlines in mumbai थोडं जरी बरं वाटत नसेल तर घरात असलेले वयस्कर, डायबेटीस, बीपीचे कोणीही असेल तर त्यांच्यापासून दूर राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लसीकरण (booster dose , corona) वेळेत घ्या ते अतिशय महत्वाचं आहे. 

Updated: Dec 30, 2022, 10:09 AM IST
Mumbai Covid New Guidelines: कोविडसंदर्भात पालिकेचा Action Plan तयार; पाहा नवीन गाईडलाईन्स title=

BMC Guidlines for Covid 19 : कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉरपोरेशन ने अधिक पावलं उचलायला सुरवात केली आहे, पुन्हा एकदा सुरक्षित अंतर पाळण्यात प्राधान्य देण्यास सुरवात करण्यात आली आहे. याशिवाय लोकांना कोरोनाविषयी जागरूक करण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आली आहे .(guidlines for covid 19 wave in mumbai)
बीएमसी यासाठी जास्त सतर्क झाली आहे कारण गेल्या लाटेप्रमाणे या वेळी कुठलाही अपप्रकार होऊ नये लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचीभीती किंवा चुकीचे प्रकार अफवा पसरू नये. कोरोना यावेळी लोकांना आपल्या कवेत घेण्याआधी उपाययोजना कारण अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणूनच बीएमसी ने कंबर कसली आहे. (BMC action plan for fight corona in mumbai )

बीएमसी कडून सांगण्यात आलं आहे कि, कोरोना वायरस विषयी जनजागृती करणं हे सर्वात महत्वाची आणि अनिवार्य अट आहे, कोविड 19 चा प्रभाव कमी करण्यासाठी बीएमसीने घालून दिलेल्या कोविड-19 गाइडलाइन पाळणं अतिशय महत्वाचं आहे, 

काय आहेत बीएमसी च्या कोविड गाईडलाईन्स

 नियमित आरटी-पीसीआर टेस्टिंग्स वाढण्यावर जोर देण्यात आला आहे शिवाय वॉर्ड रूम मधून लोकांसोबत कसा संपर्क करण्यात येईल याच्यावर सुद्धा काम सुरु आहे. 
  

लसीकरण अधिक वेगाने करण्याचे आदेश 

माहितीनुसार, बीएमसीने लसीकरणावर अधिक भर देण्यास सुरवात केली आहे शिवाय हॉस्पिटल बेड्स आणि इतर महत्वाच्या सुविधा सर्व तयारी सुरु केली आहे. बीएमसी कडून २२ डिसेंबर २०२२ रोजी जारी केलेल्या नियमावलीनुसार आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी यात्रेकरूंसाठी आरटीपीसीआर टेस्ट कारण बंधनकारक करण्यात आलं आहे आणि पॉजिटीव्ह नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठवण्याची तयारीसुद्धा करण्यात आली आहे. 
 

मुंबईतील हॉस्पिटल्स कोविडच्या इलाजासाठी सज्ज 

मुंबईत बीएमसीचे 2 हॉस्पिटल्स आहेत ज्यात कोरोनाचे उपचार केले जातात  माहितीसाठी हे कि, सेवन हिल्स, कस्तूरबा,  कामा हॉस्पिटल , सेंट जॉर्ज , टाटा , जगजीवन राम आणि  871 खाता असतील अश्या २६ हॉस्पिटल्स मध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येतील. याच हॉस्पिटल्स मध्ये वॉर्ड रुमदेखील तयार करण्यात आले आहेत. या वॉर्ड रूम मधून 24 तास काम करण्यात येईल आपल्या आपल्या परिसराच्या जवळ असणाऱ्या वॉर्ड रूममध्ये संपर्क करू शकतो.   

बीएमसी गाईडलाईन्स मध्ये या गोष्टी अतिमहत्वाच्या 

बीएमसी हॉस्पिटल परिसरात राहणाऱ्या सर्वाना मास्क घालणं बंधनकारक असणार आहे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणं बंधनकारक आहे. 
स्वच्छतेसंबंधी विशेष काळजी घेणं महत्वाचं आहे,  वारंवार साबणाने हाथ साफ करा. 
थोडं जरी बरं वाटत नसेल तर घरात असलेले वयस्कर, डायबेटीस, बीपीचे कोणीही असेल तर त्यांच्यापासून दूर राहा. आणि त्यांची काळजी घ्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लसीकरण वेळेत घ्या  ते अतिशय महत्वाचं आहे. 

सर्वानी बीएमसीने घालून दिलेल्या गाईडलाईन्स च पाळणं कारण अतिशय महत्वाचं आहे, जेणेकरून कोरोनाला हरवण्यात आपण यशस्वी होऊ.