वाल्मिक जोशी / जळगाव : शहरातील मेहरुण परिसरात असलेल्या सारा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने काही मिनिटाच रुग्ण दगावला असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत रुग्णालयातून मृतदेह घेऊन जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
सावदा येथील प्रतिभा परदेशी यांना गेल्या 40 दिवसापासून जळगाव शहरातील सारा डेडीकेटेड कोव्हिडं रुग्णायात भरती करण्यात आले होते. रुग्णाची प्रकृती चांगली होती रुग्णात सुधारणा होत असताना अचानक ऑक्सिजन कमी झाल्याने माझ्या आईचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुलगी शुभांगी परदेशी यांनी दिली.
26 एप्रिलच्या रात्री आईला पाहून शुभांगी परदेशी या घरी गेलया होत्या. आईची तब्येत चांगली होती. तिला ऑक्सिजनची गरज असल्यामुळे या ठिकाणी भरती केले होते. मात्र आज काल मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पाच ते सात मिनिटे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आईचा मृत्यू झाला असल्याची शुभांगी यांनी सांगितले.
ऑक्सिजनची लेवल कमी होत असताना मोठा भाऊ खाली जाऊन वर जायला सुद्धा सांगितले. मात्र त्यांनी कॉक बदलला नव्हता. त्यामुळे सहा मिनिटे ऑक्सिजन न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला, असा आरोप परदेशी परिवाराने सारा हॉस्पिटलवर केला आहे. ऑक्सिजन लेव्हल कमी झाली असती तर सर्व आमच्याकडे अॅडमिट रुग्ण 70 आहेत, त्यांना त्रास झाला असता अगोदरच रुग्ण हा क्रिटिकल अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
जोपर्यंत शासन यांच्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही आईचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अस पवित्रा परदेशी कुटुंबीयांनी घेतला आहे. तसेच सारा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी जळगाव शहराचे महापौर जयश्री महाजन यांनी भेट दिली यावेळी जे पण दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आहे. शहरातील सारा हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन अभावी रूग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी हॉस्पीटलला भेट दिली. या प्रकरणी त्यांनी रूग्णाच्या मेडिकल रिपोर्टच्या तपासणीसह योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.