अर्णब गोस्वामींना मारहाण झाल्याचा दावा कोर्टाने फेटाळला

रिपब्लिकचे चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा दावा केला होता. एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे

Updated: Nov 4, 2020, 07:54 PM IST
अर्णब गोस्वामींना मारहाण झाल्याचा दावा कोर्टाने फेटाळला title=

अलिबाग  : रिपब्लिकचे चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा दावा केला होता. एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा अर्णब गोस्वामी यांनी कोर्टात केला होता. मारहाणीचे व्रण अर्णब गोस्वामी यांनी कोर्टात दाखवण्याचा प्रयत्न केला होता. कोर्टाने तुम्हाला व्रण येथे दाखवता येणार नाहीत, असं सांगितलं. यानंतर कोर्टाने या प्रकरणावरील सुनावणी थांबवली आणि तात्काळ अर्णब गोस्वामी यांची पुन्हा वैद्यकीय चौकशीचे आदेश दिले.

वैद्यकीय चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुन्हा सुनावणी होईल असं कोर्टाने सांगितलं. कोर्टाजवळील पोलीस स्टेशनमध्ये यासाठी एक वैद्यकीय टीम बोलवण्यात आली. या टीमने अर्णब गोस्वामी यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी केली. तपासणी केल्यानंतर त्यांनी पुन्हा वैद्यकीय अहवाल कोर्टात दाखल केला.

वैद्यकीय अहवाल आल्यानंतर कोर्टाने अर्णब गोस्वामी यांनी पोलिसांनी मला मारहाण केली, हे आरोप तात्काळ फेटाळले आहेत. अर्णब गोस्वामी यांचा, मला पोलिसांनी मारहाण केली हा दावा देखील कोर्टात टिकला नाही.

रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.