विष प्राशन करून प्रेमीयुगुलाची आत्महत्या

पुणे जवळील आळंदी येथे प्रेमीयुगुलाने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 11, 2017, 08:33 PM IST
विष प्राशन करून प्रेमीयुगुलाची आत्महत्या title=

पुणे : पुणे जवळील आळंदी येथे प्रेमीयुगुलाने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

आज दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार समोर आला. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदखेडा येथील ३५ वर्षाच्या राहुल पाटील आणि २५ वर्षाच्या रीना गिरीगोसावी अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही धुळ्यात राहणार होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून दोघेही घरातून बेपत्ता होते. 

आज दुपारी त्यांचे मृतदेह इंद्रायणी नदीच्याकाठी आढळून आले. यावेळी त्यांच्या मृतदेहाशेजारी विषारी औषधाची बाटली आढळून आली. दरम्यान, मृत रीना हिचे लग्न झाले होते. मात्र, गेल्या काही काळापासून तिचे राहुलशी प्रेमसंबंध होते. आत्महत्येपूर्वी रीनाने आपल्या घरच्यांना फोन केला होता. त्यावेळी आपण आत्महत्या करत असल्याचे तिने सांगितले होते, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली. या घटनेने संपूर्ण धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा प्रेमसंबंधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.