कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ३३ तात्पुरती कारागृह

मुंबईमधील अर्थररोड जेलमध्ये  ४ मेला कोरोना व्हायरसचा शिरकाव 

Updated: Jun 12, 2020, 04:28 PM IST
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ३३ तात्पुरती कारागृह title=

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात सोशल डिस्टन्शिंगचे नियम पाळले जात आहेत. अशावेळा कारागृहातील कैद्यांचा देखील विचार केला जात आहे.  कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी व्हावी म्हणून राज्यभरात ३३ तात्पुरती कारागृह निर्माण करण्यात आली आहेत. कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद  यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरसपूर्वी राज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा दीडपट अधिक बंदीजन  होते. कारागृहाच्या इतिहासात पाहिल्यादाच क्षमते एवढेच बंदीजण कारागृहात राहतील अशी उपाययोजना करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. कारागृहात येणाऱ्या नवीन बंदीजनाना कोरोनाची लागण झाली असल्याचं दिसून आलं; त्यामुळे कारागृहात नवीन बंदीना ठेवलं जातं नाही अशी व्यस्था करण्यात आली होती. 

मुंबई मधील अर्थररोड जेलमध्ये  ४ मेला कोरोना व्हायरसचा शिरकाव केल्याच पहिल्यादा दिसून आलं. अर्थररोड जेल मधील २३४  बंदी जणांचे स्वाब घेण्यात आले.. त्या मधील १५८ बंदीजणांना कोरोनाची लागण झाल्याच दिसून आलं होतं.  २० मेला १५८ कैद्याच्या बरोबर २०० जणांचे अधिक स्वाब घेण्यात आले; त्यामध्ये  ५८  बंदी पॉझिटिव्ह आढळून आले.