मुंबई : राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा (State Corona Vaccine 3rd Round will be start 1st March) १ मार्चपासून सुरू होत आहे. त्यासाठी आज केंद्र आणि राज्य सरकारची (Central and State Government Meeting) महत्त्वाची बैठक होत आहे. लसीकरणासाठी मुंबईत 100 केंद्र तैनात करण्यात आलीयत. एकट्या मुंबईत 25 लाख जणांना लस दिली जाणार आहे.
त्यामुळे इतक्या मोठय़ा प्रमाणावरील लसीकरण कार्यक्रमासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी डय़ुटी जॉइन करण्यासाठी अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी काल केंद्र सरकारने महानगरपालिकेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. आज राज्य सरकारसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाची रणनीती ठरणार आहे.
राज्यात शुक्रवारी 8 हजार 333 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. लागोपाठ तिस-या दिवशी राज्यात 8 हजाराहून अधिक रुग्ण वाढले आहेत. दिवसभरात राज्यात 48 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राजधानी मुंबईत 1 हजार 34 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत देखील लागोपाठ तिस-या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या हजाराहून अधिक आहे. राज्यात सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 67 हजार 608 वर पोहोचली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ४ हजार 936 रुग्ण बरे होऊन घरी गेले..
कोरोना रूग्णसंख्या सातत्यानं वाढत राहिल्यास आणि नागरिकांचा निष्काळजीपणा असाच चालू राहिल्यास, मुख्यमंत्री पुन्हा लॉकडाऊन आणण्याची शक्यता कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर नितीन कर्णिक यांनी व्यक्त केली आहे. 15 ते 25 वयोगटातले तरूण कोरोनाचे गंभीर रूग्ण होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.