Covid-19 in India : चीनसह (China) संपूर्ण जगभरात पसरलेली कोरोनाची नवी लाट (Corona Wave) भारतातही येण्याची शक्यता आहे. तिचा मुकाबला करण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आता शिर्डीतल्या साईबाबा संस्थाननेही (Shirdi Saibaba) सतर्कतेचे उपाय सुरु केले आहेत. साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी साईबाबा संस्थानने (Shri Saibaba Sansthan Trust) आवाहन केलं आहे.
दर्शनाला येताय, हे नियम पाळा
दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्क वापरावा
सोशल डिस्टनसिंगसह सॅनिटायझरचा वापर करावा
ज्यांनी बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घ्यावेत
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी
साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी हे आवाहन केलं आहे. कोविडच्या धास्तीने अनेक साईभक्तांच्या चेहऱ्यावर पुन्हा मास्क दिसू लागले आहेत.
IMA ने जारी केली नियमावली
चीनमध्ये ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट BF.7 ने धुमाकूळ घातला आहे. भारतातही चिंत वाढली आहे. भारतात या व्हेरिएंटचे 4 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार सतर्क झालं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) ने नियमावली जाही केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा (Mask Mandatory)
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा (Social Distancing)
सॅनिटायझर आणि साबनाने हात स्वच्छ करा (use sanitizer)
राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना जाणं टाळा
आंतरराष्ट्रीय यात्रा करत असाल तर सावधगिरी पाळा
ताप, घसा खवखवणे, खोकला अशी लक्षणं आढळली तर तात्काळ डॉक्टरांकडून तपासून घ्या (Symptoms)
लसीकरण झालं नसेल तर तातडीने करुन घ्या, बूस्टर डोस घ्या
भारतात 145 प्रकरणांची नोंद
भारतात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 145 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात BF.7 विषाणूची लागण झालेल्या 4 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारही आता अॅक्शन मोडवर आलं आहे. परदेशी प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच नवी गाईडलाईन जाहीर होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आढावा बैठक घेणार आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही महत्त्वाच्या बैठका होणार आहेत.