राज्यात आज कोरोनाच्या ५२२ नवीन रुग्णांची नोंद

राज्यभरात आतापर्यंत १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. 

Updated: Apr 27, 2020, 09:16 PM IST
राज्यात आज कोरोनाच्या ५२२ नवीन रुग्णांची नोंद title=

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ८५९० वर पोहोचली आहे. तर आज ९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यभरात आतापर्यंत १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख २ हजार ५२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८५९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं असून ९,३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २७ करोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३६९ वर पोहोचली आहे. आज झालेल्या मृत्यूमध्ये मुंबईचे १५, अमरावती शहरातील ६, पुणे शहरातील ४ तर जळगाव येथील १ आणि औरंगाबाद शहरातील १ आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू हे दिनांक २० ते २५ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत.

आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १२ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यातील एकाला एच आय व्ही आणि आणखी एक रुग्णाला कर्करोग होता.
 
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्ण आणि मृत्यू

मुंबई महानगरपालिका: ५७७६ (२१९)
ठाणे: ४० (२) 
ठाणे मनपा: २९५ (४)
नवी मुंबई मनपा: १३५ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: १४५ (३)
उल्हासनगर मनपा: २
भिवंडी निजामपूर मनपा: १४
मीरा भाईंदर मनपा: १२१ (२)
पालघर: २५ (१)
वसई विरार मनपा: १२१ (३)
रायगड: १८
पनवेल मनपा: ४३ (१)
ठाणे मंडळ एकूण: ६७३५ (२३८)

नाशिक: ४
नाशिक मनपा: १९
मालेगाव मनपा:  १२३ (१२)
अहमदनगर: २६ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ४८(२)
धुळे मनपा: १७ (१)
जळगाव: १८ (४)
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ११ (१)
नाशिक मंडळ एकूण: २४४ (२३)

पुणे:५८ (३)
पुणे मनपा: ९६९ (७४)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ६
सोलापूर मनपा: ५९ (५)
सातारा: २९ (२)
पुणे मंडळ एकूण: ११९३ (८७)

कोल्हापूर: ७
कोल्हापूर मनपा: ४
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४७ (२)

औरंगाबाद:१
औरंगाबाद मनपा: ५१ (६)
जालना: २
हिंगोली: ८ 
परभणी: ०
परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ६३ (६)
लातूर: १० (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३ 
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ३
लातूर मंडळ एकूण: १७ (१)

अकोला: ११ (१)
अकोला मनपा: १८
अमरावती: १
अमरावती मनपा: २१ (७)
यवतमाळ: ६२
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १ 
अकोला मंडळ एकूण: १३५ (९)

नागपूर: ४
नागपूर मनपा: १२३ (१)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १३१ (१)

इतर राज्ये: २५ (२)
एकूण: ८५९०  (३६९)