नागपुरात कोरोनाचे पुन्हा थैमान, एका दिवसात ४८ जणांचा मृत्यू

कोरोना विषाणूचा मोठ्याप्रमाणात प्रार्दुभाव दिसून येत आहे. कोरोनाने पुन्हा थैमान घालले आहे.  

Updated: Sep 16, 2020, 09:46 AM IST
नागपुरात कोरोनाचे पुन्हा थैमान, एका दिवसात ४८ जणांचा मृत्यू   title=

नागपूर : कोरोना विषाणूचा मोठ्याप्रमाणात प्रार्दुभाव दिसून येत आहे. कोरोनाने पुन्हा थैमान घालले आहे. काल नागपुरात तब्बल १९५७ रूग्ण आढळले. तर कालच्या दिवसात ४८ जणांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे काल नागपुरात ६३२१ चाचण्या झाल्या. त्यात १९५७ जण कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

नागपुरात काल १ हजार ६६६ जण कोरोनामुक्त झाले. कमी चाचण्या होऊनही त्यात कोरोनाग्रस्तांची संख्या कमालीची अधिक आढळल्याने काळजीचं वातावरण आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५५ हजार ४३० वर गेला आहे. तर नागपुरात आत्तापर्यंत १७५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, नागपुरात कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या टप्प्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. गिल्लूरकक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या टप्प्यात ५० जणांना लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत कोणलाही दुष्परिणाम दिसून आला नसल्याचं डॉ चंद्रशेखऱ गिल्लूरकर यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे चाचणीला यश येत असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाने अलिकडेच कोरोनाबाबतचा आढवा घेतला. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. पालकमंत्री  नितीन राऊत आणि  गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. नागपुरात गेल्या १५ दिवसांत २१ हजार पेक्षा अधिक रुग्ण वाढले आहे. तर दररोज मृत्यूही ५० च्या जवळपास होत आहेत. कोरोनाची स्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक झाली.