मुंबई : गेल्या 24 दिवसात महाराष्ट्रात कोरोनाचे 58,993 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 301 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनामुळे मृतांची संख्या आता 57,028 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची संख्या आता 32,88,540 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात आज 45,391 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात आतापर्यंत 26,95,148 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात सध्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 5,34,603 इतकी आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदर 1.74 टकके असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 81.96 टक्के आहे.
राज्यात सध्या 26,95,065 व्यक्ती होम क्वारंटाईन असून 24,157 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 8,938 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 4,91,980 वर गेली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 11,881 मृत्यू झाले आहेत.