पुणे : शनिवार आणि रविवार या 2 दिवशी राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या दिवशी काही अत्यावश्यक गोष्टी सोडून इतर सर्व गोष्टी बंद राहणार आहे. राज्य सरकाराने कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. कोरोनाचे रुग्ण जर असेच वाढत राहिले तर राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना वारंवार नियम पाळण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
आज सायंकाळी 8 पासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु झाली आहे. नियम लागू झाल्यापासून उद्या पहिला शनिवार आणि रविवार असल्याने या दरम्यान काय सुरु राहणार आणि काय बंद राहणार याबाबत शासनाने नियमावली जाहीर केली आहे.
काय सुरु राहणार?
- दूध दुकानं सुरु राहतील.
- मेडिकल सुरू राहितील
- इतर दुकाने आणि आस्थापना बंद राहील
- वैद्यकीय आणि अतितातडीच्या कारणास्तव बाहेर पडता येणार
- स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना जाता येईल, सोबत एक व्यक्ती नेण्याची परवानगी
काय बंद राहणार ?
- भाजीपाला दुकान / मंडई बंद
- हॉटेल, बार, रेस्टॉरंट मधून घरपोच पार्सल सेवा मिळणार
- स्विगी आणि झोमॅटो यांच्यामार्फत पार्सल सेवा सुरू राहील
- वाईन शॉप बंद
- घरेलू कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी, जेष्ट नागरीक, वैद्यकीय मदतनीस यांना सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत प्रवास करता येईल
- स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मेस मधून सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत पार्सल घेता येणार
- PMPL सेवा अत्यावश्यक सेवा वगळून शनिवार रविवार बंद राहणार
- अत्यावश्यक सेवा कारणास्तव ओला / उबेर सुरू राहणार
- कामगारांना प्रवास करताना RTPCR प्रमाणात सोबत बाळगावे लागणार
- कोरोना नियम पाळून औद्योगिक वसाहत सुरू राहणार