कोरोनामुळे पहिल्या पत्नीचं निधन, चार महिन्यात दुसऱ्या पत्नीनेही केली आत्महत्या

असं नेमकं काय घडलं की लग्नाच्या चार महिन्यांनंतरच तीने टोकाचं पाऊल उचललं

Updated: Feb 17, 2022, 05:39 PM IST
कोरोनामुळे पहिल्या पत्नीचं निधन, चार महिन्यात दुसऱ्या पत्नीनेही केली आत्महत्या title=

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातल्या ठाणा इथे एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिपा मेहर असं या महिलेचं नाव असून अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

30 वर्षांच्या दिपा मेहर हिचं चार महिन्यांपूर्वी प्राध्यापक धर्मेंदर मेहर यांच्याशी लग्न झालं होतं. धर्मेंद्र मेहर यांचं हे दुसरं लग्न. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचं कोरोनामुळे निधन झालं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलांचं संगोपन करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये धर्मेंद्र यांनी दिपाशी दुसरं लग्न केलं.

पण लग्नाच्या चार महिन्यात दिपाने राहत्या घारी पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. दिपाच्या आत्महत्येस पती धर्मेंद्र जबाबदार असल्याचा आरोप दिपाच्या आई-वडिलांनी केला आहे. धर्मेंद्र यांचं त्यांच्या वहिणीशी अनैतिक संबंध होते, यातूनच ते दिपाला मानसिक त्रास देत होते, त्यामुळे नैराश्यातून दिपाने टोकाचं पाऊल उचललं असा आरोप दिपाच्या आई-वडिलांनी केला आहे.

पोलिसांनी तपासानंतर धर्मेंद्र मेहर आणि त्याच्या वहिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.