मुंबई : महाराष्ट्रात बँकांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत चेक क्लियरेंस होणार आहे. हे नवे बदल 23 एप्रिलपासून लागू होणार आहेत. याआधी उत्तर प्रदेशसह देशाच्या अनेक राज्यांमध्ये बँक उघडण्याचा आणि बंद होण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पण नेट बँकिंगच्या मदतीने इतर कामे करता येणार आहेत.
9 बँकांचे यूनियन यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियंसचं म्हणणं आहे की, प्रत्येक बँकेत संक्रमणाचा धोका वाढला आहे. बँकेचे कर्मचारी आजारी पडल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आधीच देशात ऑक्सीजन आणि बेड उपलब्ध होणं कठीण झालं आहे.
यूएफबीयूने मागणी केली आहे की, जोपर्यंत परिस्थिती सुधरत नाही तोपर्यंत कामकाजाची वेळ 3 तासाची करण्यात यावी. सेवांवरर देखील काही प्रतिबंध आले पाहिजे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्यापासून वाचवता येईल.
बँकेत एका वेळेला 50 टक्के कर्मचारीच उपस्थित राहू शकतात. इतर कर्मचारी घरुन काम करतील. ATM, सिक्योरिटी, डेटा ऑपरेशन, सायबर सेक्योरिटी, क्लियरिंग हाउस, बँक ट्रेजरी संबंधित कामे नेहमी प्रमाणे सुरु राहतील. 15 मेपर्यंत हे नवे नियम लागू असतील.