कोरोनाचा उद्रेक : 10 जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्णवाढ, परभणीत कडक संचारबंदी

कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक दिसून येत आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यात  संचारबंदी लावण्यात आली आहे.  .

Updated: Mar 25, 2021, 07:38 AM IST
कोरोनाचा उद्रेक : 10 जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्णवाढ, परभणीत कडक संचारबंदी  title=

परभणी : कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक दिसून येत आहे. कोरोनाचा (Covid-19) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याने राज्यातल्या अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यात काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून 1 एप्रिलच्या सकाळी 6 पर्यंत कडक संचारबंदी लावण्यात आली आहे. संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर प्रशासन कडक कारवाई करणार आहे. तर देशातल्या 10 जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढ झाली आहे. यात महाराष्ट्रातल्या महत्वाच्या 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबईत 24 तासात 5 हजार185 रुग्ण वाढ झाली आहे. तर ठाण्यातली परिस्थितीही चिंताजनक आहे.

नांदेड जिल्ह्यात आजपासून 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरू होत आहे. नांदेड जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार या काळात बंद असतील. मात्र आजपासून लॉकडाऊन सुरु होणार असल्यानं काल नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात तुडुंब गर्दी केली. बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असेल. या काळात शाळा, कॉलेजे, सर्व खासगी कार्यालयं, बांधकामं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.. फक्त अत्यावश्यक सेवा सुरु असतील. 

देशातल्या ज्या दहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढतायत त्यात राज्यातल्या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्या पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अकोला, जळगाव या शहरांचा समावेश आहे. तर बंगळुरुतही रुग्ण वाढलेयत. मुंबईत सर्वाधिक 5हजार 185 रुग्ण वाढलेयत. तर ठाण्यात 2 हजार 869 रुग्ण वाढलेयत. मुंबईत पालिकेनं चाचण्यांवर भर दिलाय. येत्या काही दिवसांत रुग्णवाढ अशीच सुरु राहील असं तज्ज्ञांचं मत आहे.