कोरोनाचा संसर्ग : पुणे महापालिकेचा महत्वाचा निर्णय

 Coronavirus in Pune :राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेने महत्वाची निर्णय घेतला आहे. 

Updated: Jan 14, 2022, 07:37 AM IST
कोरोनाचा संसर्ग : पुणे महापालिकेचा महत्वाचा निर्णय title=
संग्रहित छाया

पुणे : Coronavirus in Pune :राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. मुंबईनंतर पुण्यात सर्वाधिक कोरोना बाधितांचा आकडा दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेने महत्वाची निर्णय घेतला आहे.(Corona infection: There will be two doses of vaccine, they will get entry in Pune Municipal Corporation)

कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या लोकांनाच यापुढे महापालिकेत प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिली. याबाबतचे आदेश महापालिकेने सर्व विभागाना दिले आहे. याचे काटेकोरपणे पालन करण्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात  आले आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपायोजना पालिकेकडून गर्दी होऊ नये म्हणून महापालिका भवन, क्षेत्रिय कार्यालयामध्ये नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. नागरिक यांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता आपले म्हणणे, तक्रार, सूचना या लेखी स्वरुपात ईमेलद्वारे संबंधित विभागास पाठवणे आवश्यक आहे, असे या आदेशात म्हटले आहे.