राज्यात एका दिवसात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण संख्या ४,२०० वर

राज्यात एका दिवसात सापडले सर्वाधिक रुग्ण

Updated: Apr 19, 2020, 09:54 PM IST
राज्यात एका दिवसात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण संख्या ४,२०० वर title=

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजच्या एका दिवसात राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. मागच्या २४ तासात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५५२ने वाढला आहे. एवढ्या दिवसांमधली ही सर्वाधिक वाढ आहे. आज दिवसभरात राज्यात १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातली कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४,२०० वर गेली आहे.

आजच्या एका दिवसात कोरोनाच्या १४२ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आत्तापर्यंत ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. आज मृत्यू झालेल्या १२ जणांपैकी मुंबईमधील ६, मालेगावमधील ४, सोलापूरमधील १ आणि अहमदनगरच्या जामखेडमधील १ व्यक्ती आहे.

आज झालेल्या १२  मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील  ६ रुग्ण आहेत तर ५  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे.  मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या ४ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.  उर्वरित ८ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये ( ७५ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२३ झाली आहे.

फक्त मुंबईमध्ये कोरोनाचे २,७२४ रुग्ण आढळले आहेत, तर मुंबईत कोरोनामुळे १३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ठाणे मंडळात कोरोनाचे ३,२१४ रुग्ण आहेत, तर या भागात १४८ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

राज्यातली कोरोनाची आकडेवारी 

मुंबई महानगरपालिका: २७२४ (मृत्यू- १३२)

ठाणे: २० (२ मृत्यू) 
ठाणे मनपा: ११० (२मृत्यू)
नवी मुंबई मनपा: ७२ (३मृत्यू)
कल्याण डोंबवली मनपा: ६९ (२मृत्यू)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: ५
मीरा भाईंदर मनपा: ७१ (२मृत्यू)
पालघर: १७ (१मृत्यू)
वसई विरार मनपा: ८५ (३मृत्यू)
रायगड: १३
पनवेल मनपा: २७ (१मृत्यू)

ठाणे मंडळ एकूण: ३२१४ (१४८मृत्यू)

नाशिक: ४
नाशिक मनपा: ५
मालेगाव मनपा:  ७८ (६मृत्यू)
अहमदनगर: २१ (२मृत्यू)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: १ (१मृत्यू)
धुळे मनपा: ०
जळगाव: १
जळगाव मनपा: २ (१मृत्यू)
नंदूरबार: १

नाशिक मंडळ एकूण: १२१ (१०मृत्यू)

पुणे: १७ (१मृत्यू)

पुणे मनपा: ५४६ (४९मृत्यू)

पिंपरी चिंचवड मनपा: ४८ (१मृत्यू)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: १५ (२मृत्यू)
सातारा: ११ (२मृत्यू)

पुणे मंडळ एकूण: ६३७ (५५मृत्यू)

कोल्हापूर: ३
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ६ (१मृत्यू)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४० (१मृत्यू)

औरंगाबाद:०
औरंगाबाद मनपा: ३० (३मृत्यू)
जालना: १
हिंगोली: १ 
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ३३ (३मृत्यू)
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३ 
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ०

लातूर मंडळ एकूण: १२

अकोला: ७ (१मृत्यू)
अकोला मनपा: ९
अमरावती: ०
अमरावती मनपा: ६ (१मृत्यू)
यवतमाळ: १४
बुलढाणा: २१ (१मृत्यू)
वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ४८ (३मृत्यू)

नागपूर: २
नागपूर मनपा: ६७ (१मृत्यू)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ७२ (१मृत्यू)

इतर राज्ये: १३ (२मृत्यू)

एकूण: ४२००  (२२३मृत्यू)