औरंगाबाद येथे बजाज कंपनीसह ५० उद्योग सुरु करण्यास परवानगी

कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेले उद्योग-धंदे पुन्हा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. 

Updated: Apr 24, 2020, 10:35 AM IST
औरंगाबाद येथे बजाज कंपनीसह ५० उद्योग सुरु करण्यास परवानगी title=
संग्रहित छाया

औरंगाबाद : कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेले उद्योग-धंदे पुन्हा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे बंद असलेली आर्थिक उलाढाल सुरु होण्यास चालना मिळणार आहे. बजाज कंपनीसह इतर ५० उद्योगांना सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे हे उद्योग आजपासून सुरू होणार आहेत. बजाज कंपनीला ८५० कर्मचारी ठेवून कंपनी सुरु करता येणार आहे. कंपनीत कर्मचारीसुद्धा शहरातून जाणार नाहीत. 

कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोचा फैलाव होत असल्याने उद्योग-धंदे बंद करण्यात आले होते. त्यामुळे मोठे नुकसान होत होते. लॉकडाऊन-२ घोषित करण्यात आल्यानंतर २० एप्रिलला थोडी शिथिलता देण्यात आली. त्यानुसार व्यापार आणि उद्योग-धंदे सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, यासाठी कडक बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे कोणीही कारखाने सुरु करण्यास धजावत नव्हते. मात्र, औरंगाबादमध्ये आता ५० उद्योग सुरु करण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बंद असलेले उद्योन आता नव्याने सुरु होणार आहेत.

जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर या कंपनी सुरु होणार आहेत. या कर्मचाऱ्यांना शहरात येण्यावरसुद्धा बंदी असणारआहे. बाहेरुन कोणालाही कंपनीत प्रवेश मिळणार नाही, याची दक्षता कंपनीला घ्यायची आहे. कंपनी सुरु होणे ही निश्चित दिलासा देणारी बातमी आहे.  त्यामुळं गेल्या महिनाभरापासून बंद पडलेल्या उद्योगांना चालना मिळणार आहे.