चिंता वाढली, मुरबाडमधील गावांत कोरोनाची परिस्थिती चिंताजनक

कोरोनाचा (Coronavirus,) उद्रेक दिसून येत आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनाची स्थिती चिंताजनक होत आहे. 

Updated: May 20, 2021, 02:23 PM IST
चिंता वाढली, मुरबाडमधील गावांत कोरोनाची परिस्थिती चिंताजनक title=
संग्रहित फोटो

 मुरबाड : राज्यात कोरोनाचा (Coronavirus,) उद्रेक दिसून येत आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनाची स्थिती चिंताजनक होत आहे. आता ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असले तरी ग्रामीण भागात (Rural areas) कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. मुरबाड (Murbad) तालुक्यात कल्याण-नगर महामार्गालत असलेले सरळगांव, वडवली, उंबरपाडा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असून मृतांचे प्रमाणही अधिक आहे. (Corona crisis : Corona's situation in the village of Murbad is Dangers)

ठाणे  जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने तातडीने लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत मुरबाड परिसरात कोरोनाचे फारसे रुग्ण आढळून आले नव्हते. दुसऱ्या लाटेत मात्र सुरुवातीपासूनच तालुक्यातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. 

विशेषत: महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. सरळगांव ही तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ आहे. आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ तिथे खरेदी आणि विक्रीसाठी येतात. महामार्गावरचे गाव असल्याने मुंबई, ठाणे, पुणे, नगर परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांचाही बाजारात राबता असतो. सध्या या गावात रुग्णसंख्या वाढली आहे. 

तसेच या सरळगांव लगत वडवली गावातील 14 जण गेल्या महिन्याभरात  कोरोनामुळे मृत्यूमुखी पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावात तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे आवाहन करणारे पत्र ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या सदस्यांच्या मार्फत प्रशासनाला दिले आहे.