कुत्र्यांच्या पुढ्यातून अन्न उचलून फेकले; पोलिस महिलेची महिलेवरच दादागिरी

रस्त्यावर कुत्र्यांना जेवण टाकण्यावरुन वाद झाला. एका महिला पोलिसाने महिलेला मारहाण केली आहे. पुण्यात हा प्रकार घडला आहे. 

Updated: Oct 23, 2023, 11:08 PM IST
कुत्र्यांच्या पुढ्यातून अन्न उचलून फेकले; पोलिस महिलेची महिलेवरच दादागिरी  title=

Pune Crime News : पोलीस कर्मचारी महिलेने महिलेवरच दादागिरी केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे.  भटक्या कुत्र्यांना अन्न देणाऱ्या महिलेवर पोलिस महिलेने हल्ला केला आहे. पोलीस कर्मचारी महिलेने कुत्र्यांच्या पुढ्यातून अन्न उचलून फेकून दिले. 

धायरी,डीएसके विश्व येथील चद्रंमा सोसायटीच्या भागात राहणार्‍या भटक्या श्वानांना वेळेवर अन्न मिळत नसल्याने अन्नासाठी भटकंती करताना अपघात होतात आणि निष्पाप जीव जातो. या मुक्या प्राण्यांना आहे त्या ठिकाणी अन्न देण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून मनिषा पवार यांच्याकडून केले जात आहे. या मानवतावादी कार्यात अडथळा आणत भटक्या श्वानांना अन्न का देते म्हणत पोलिस महिलेने मनिषा यांच्यावर हल्ला करत श्वानांसाठी आणलेले अन्न फेकून दिले. मोहिणी पैठणकर/कुलकर्णी असे या पोलिस महिले नाव आहे. त्या  चंद्रमा सोसायटीत राहतात.

पवार यांच्या फिर्यादीवरून पदाचा गैरवापर करत प्राणी प्रेमी महिलेवर हल्ला करत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी  पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात पैठणकर/कुलकर्णी यांच्याविरोधात पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील अनेक भागांमध्ये जाऊन ज्या ठिकाणी भटक्या श्वानांचा अधिक वावर आहे. त्याठिकाणी रोज सायंकाळी त्यांच्यासाठी खाद्य घेवून जात वाटप करण्याचे काम मनिषा पवार यांच्याकडून केले जाते. अद्यापर्यंत एकाही श्वानने कुठल्याच व्यक्तीस इजा पोहचेल असे कृत्य केले नसतानाही भटक्या श्वानला अन्न का देते म्हणत पवार यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यामुळे पवार यांनी पशुसंवर्धन तक्रार विभागाकडे तक्रार करत हवेली  पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि ३२३,५०६,४२७ प्रमाणे पैठणकर - कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित घटनेचा अहवाल ग्रामीण पोलीस अधिक्षकांना पाठवण्यात आला आहे. 

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचा मृत्यू

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचा मृत्यू झालाय. त्यांच्या निधनामुळं उद्योगजगतासह सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होतीय..गेल्या आठवड्यात, १५ ऑक्टोबर रोजी मॉर्निंग वॉकला निघालेल्या पराग देसाई यांच्यावर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना पाय घसरून ते पडले. त्यात त्यांना जबर मार लागला आणि त्यांच्या मेंदूतून रस्तस्त्राव झाला. त्यांच्यावर शेल्बी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळं त्यांना झायडस रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र, काल सकाळी अहमदाबादमध्ये त्यांचं निधन झालं.