आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणतात, 'नागडा करुन मारु'

तानाजी सावंत यांची जीभ घसरली

Updated: Sep 24, 2022, 05:36 PM IST
 आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणतात, 'नागडा करुन मारु'  title=

विष्णु बर्गे, झी मीडिया, बीड : आपल्या वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बीडमध्ये (Beed) एका सभेत बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी हे वादग्रस्त वक्तव्य (Controversial statement) केलं आहे. आमच्यावर शिंतोडे टाकण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला नागडा करून मारू असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

बीडमध्ये हिंदू गर्जना मेळाव्यात बोलताना तानाजी सावंत यांची जीभ घसरली. "तुमचा आवाज काय? तुमचं चारित्र्य काय? तुम्ही कुणावर शिंतोडे उडवता. आम्हालाही बोलता येतं. माझ्या नेत्यावर टीका करायची परंपरा तुम्ही सोडली नाही तर या बीडमध्ये तुम्हाला नागडा करुन मारताना दिसणार," असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. (Controversial statement of Minister Tanaji Sawant in Beed)

दरम्यान, या वक्तव्याबद्दल तानाजी सावंत यांना विचारलं असता ज्यांना मी बोललो त्यांना कळले असेल असं म्हणत यावर अधिक भाष्य करणे मात्र टाळलं.

सरकारला वेळ दिला पाहिजे - तानाजी सावंत

"महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या काळामध्ये कुठलाही नेता मराठा आरक्षणावर बोलला नाही. जसं सत्तांतर झालं मराठा चेहरा मुख्यमंत्री झाला आणि पुन्हा तोच प्रश्न उपस्थित केला गेला. मी देखील मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या मताचा आहे. मात्र सरकारला वेळ दिला पाहिजे. हे सरकार मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारच," असं आश्वासन मंत्री तानाजी सावंत यांनी दिलय.