… तर त्या काँग्रेसच्या नेत्याला दोन लाथा घाला - सुनील केदार

सुनील केदार ( sunil kedar ) यांनी केले आहे. त्यांनी यावेळी काँग्रेस पक्षाशी बेईमानी करणाऱ्या नेत्यांना चांगलाच दम भरला आहे.  

Updated: Sep 21, 2021, 12:55 PM IST
… तर त्या काँग्रेसच्या नेत्याला दोन लाथा घाला - सुनील केदार title=

नागपूर : Nagpur Zilla Parishad by-election : कितीही मोठा नेता असून द्या, जो जिल्हा परिषदच्या पोट निवडणुकीत ((Nagpur Zilla Parishad by-election) ) काँग्रेससोबत (Congress) बेईमानी करेल त्या नेत्याला गाडीतून ओढून काढा आणि दोन लाथा घाला. पोलीस केसेस मी बघून घेईन. वेळ आली तर मी मंत्रिपद बाजूला ठेवेन. मी पण पुढे येईन, असे धक्कादायक वक्तव्य दुग्ध व पशु संवर्धन मंत्री सुनील केदार ( sunil kedar ) यांनी केले आहे. त्यांनी यावेळी काँग्रेस पक्षाशी बेईमानी करणाऱ्या नेत्यांना चांगलाच दम भरला आहे. ते नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत बोलत होते. (Congress sunil kedar appeal supporters to Kick the Cheating party leaders in nagpur)

नागपूरमध्ये जिल्हा परिषद पोटनिवडणूक (Nagpur Zilla Parishad by-election) आणि जिल्हा परिषद ( (Nagpur Zilla Parishad) समित्यांच्या निवडणुका होत आहेत. यानिमित्ताने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गद्दारांना धडा शिकवा, असा सल्ला सुनील केदार यांनी कार्यकर्त्यांना दिला. आपण सर्वांनी मेहनतीने हा पक्ष उभा केला आहे. कोणीतरी मोठी व्यक्ती माझ्या मागे आहे, त्यामुळे वाटेल तसे करणार हे चालणार नाही, असेही यावेळी ते म्हणाले.