काँग्रेसच्या उपोषण आंदोलनाचा स्टेज कोसळला

काँग्रेसचा उपोषणादरम्यान स्टेज कोसळला

shailesh musale Updated: Apr 9, 2018, 05:02 PM IST
काँग्रेसच्या उपोषण आंदोलनाचा स्टेज कोसळला title=

चंद्रपूर : काँग्रेसतर्फे सुरू करण्यात आलेल्या उपोषण आंदोलनाचा स्टेज कोसळला. जटपुरा गेट इथे गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसचं उपोषण सुरू आहे. मात्र अचानक स्टेज तुटल्यानं कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. पण वेळीच सावरल्यामुळं उपोषण पुन्हा सुरू करण्यात आलं. तर स्टेज कोसळलं नसून केवळ झुकल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

दलितांच्या हिंसेविरोधात काँग्रेसने सोमवारी देशव्यापी उपवास ठेवला आहे. याचा भाग बनण्य़ासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत अनेक दिग्गज नेते राजघाटला पोहोचले. पण याआधी एक फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये काँग्रेसचे मोठे नेते दिल्लीतील चांदनी चौक येथील एका हॉटेलमध्ये जेवनावर ताव मारतांना दिसले. फोटोमध्ये अरविंदर सिंह लवली, हारून यूसुफ आणि अजय माकन देखील दिसत आहेत. फोटो व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते त्यांचा बचाव करतांना दिसले आहे.