''विकृत पोंक्षे, टुकार अभिनेता...''; अभिनेत्याच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर कॉंग्रेसची तिखट प्रतिक्रिया

Congress on Sharad Ponkshe Statement: सध्या चर्चा आहे ती म्हणजे शरद पोंक्षे यांची. त्यांच्या गांधी कुटुंबियांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली होती आता कॉंग्रेसनं त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 17, 2023, 01:26 PM IST
''विकृत पोंक्षे, टुकार अभिनेता...''; अभिनेत्याच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर कॉंग्रेसची तिखट प्रतिक्रिया title=
August 17, 2023 | congress replay on sharad ponkshes controversial statement on rahul gandhis surname tweet goes viral

Sharad Ponkshe Statement: शरद पोंक्षे हे मराठीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. परंतु अनेकदा ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असतात. यावेळीही ते त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले असून यावेळी त्यांनी थेट कॉंग्रेस नेते राहूल गांधी आणि गांधी कुटुंबियांवरच निशाणा साधला होता. राहूल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' सुरू असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर त्यांनी केली वादग्रस्त विधान केलेले होते. त्यावरून बराच गदारोळ सुरू झाला होता. यावर अनेकांच्या संतप्त प्रतिक्रियाही उमटू लागल्या होत्या. त्यावर शरद पोंक्षे यांनीही विरोध दर्शवला होता. थेट अंदमानच्या तुरूंगातून त्यांनी राहूल गांधी यांच्यावर टीका करणारा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता त्यांनी गांधी आडनावावरून एक व्यक्तव्य केले आहे जे बरेच चर्चेत आहे. यावर आता कॉंग्रेसनंही प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वातावरण हे पुर्णत: तापलेले दिसते आहेत. आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे त्यात आता या नव्या वादानं पुन्हा एकदा राजकीय रणांगण पेटलं आहे. 

अभिनेते शरद पोंक्षे यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या आडनावावरून वादग्रस्त टिप्पणी केली आहे. यावेळी त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे खरे गांधी नाहीत आणि तर खान आहेत. त्यांच्या या विधानावरून राजकीय वातावरण तापले आहे. गांधी कुटुंबिंयांनी अॅफिडेव्हिट करून हे आडनावं बदललं आहे. सोबतच महात्मा गांधींचे वंशज हे नाहीत.  गांधी आडनावाचा फायदा घेण्यासाठी त्यांनी हे आडनाव घेतलं आहे. ही फिरोज खान यांची पुढची पिल्लावळ आहे. हा इतिहास आहे, अशी वादग्रस्त मांडणी त्यांनी केली होती. 

हेही वाचा : OMG!!! 72 व्या वर्षी काय बॉडी; बॉलिवूडच्या 'या' विलनची बातच न्यारी!

यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, “शरद पोंक्षे हा अभिनेता म्हणून टुकार तर आहेच. पण माणूस म्हणूनही नीच आहे”. यावेळी शरद पोंक्षेंच्या विधानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टिप्पणी करत लिहिलं आहे की, ''हा विकृत पोंक्षे अजून काय बोलू शकतो…नथुरामची अवलाद…” सध्या त्यांच्या या ट्विटरवरून दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगलेली आहे. 

''स्वातंत्र्यदिनादिन नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव येथे भारतीय विचार मंचच्या वतीनं शरद पोंक्षे यांचे सावरकरांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील अध्यक्षस्थानी होते. त्यांनी यावेळी फिरोज गांधी यांचे मुळ आडनावं हे खान असल्याचा दावा केला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, राहुल गांधी हे सावरकरही नाहीत आणि गांधीही नाहीत. राहुल गांधी यांना आपल्या आजीचा इतिहास माहित नाही तर सावरकरांचा कसा माहित असणार'', अशीही टीका त्यांनी केली होती.