राहुल गांधी पुण्यातील विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.  

Updated: Apr 3, 2019, 08:27 PM IST
राहुल गांधी पुण्यातील विद्यार्थ्यांशी साधणार संवाद title=

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. येत्या शुक्रवारी म्हणजेच ५ तारखेला राहुल गांधी यांचा पुणे दौरा आहे. या दरम्यान पुण्यातील हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. आगामी निवडणुकीत युवा मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे लोकसभा उमेदवारांचे भवितव्य हे युवकांच्या हाती आहे. त्यामुळे काँग्रेसकडून युवकांना साद घातलण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी पुण्यात येत आहेत. हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स येथे राहुल गांधी यांचा कार्यक्रम पार होणार आहे. युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि एनएसयुआयच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात फक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती आमदार विश्वजित कदम यांनी दिली.

या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी पुण्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना देखील भेटणार आहेत, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, असा कोणताही अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले आहे.