ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चाबाबतच्या परिपत्रकाला विरोधकांचा विरोध

ऊस तोडणी आणि वाहतूक याचा खर्च अंतरानुसार ठरवावा असं परिपत्रक राज्य सरकारने काढलंय. मात्र या परिपत्रकाला विरोधकांनी कडाडून विरोध केलाय.

Updated: Dec 27, 2017, 04:36 PM IST
ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चाबाबतच्या परिपत्रकाला विरोधकांचा विरोध title=

मुंबई : ऊस तोडणी आणि वाहतूक याचा खर्च अंतरानुसार ठरवावा असं परिपत्रक राज्य सरकारने काढलंय. मात्र या परिपत्रकाला विरोधकांनी कडाडून विरोध केलाय.

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात २५, ५०, ७५ आणि १०० किलोमीटर अशा अंतराचे टप्पे ठरवून देण्यात आलेत. या अंतरानुसार शेतक-यांच्या बिलातून हे पैसे कपात करावेत असं परिपत्रकात सांगण्यात आलंय. मात्र या परिपत्रकाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केलाय. 

हा फॉर्म्युला अन्यायकारक असल्याचं शरद पवार यांनी सांगितलंय. तर कारखान्याजवळच्या ऊसावरच फक्त कारखाना चालत नाही अशी टीका करत वाहतूक खर्च सरासरी काढण्याची पद्धत कायम ठेवण्याची मागणी केली.