कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार संजय साडवीलकर यांच्या विरोधात या हत्येतील प्रमुख संशयीत आरोपी समीर गायकवाडने जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केलाय.
अर्जात समीर गायकवाडनं साक्षीदार संजय साडविलकरनं १९८५ ते १९८८ या काळात आपण अवैध्य पिस्तुल खरेदी- विक्रीचा व्यवसाय केल्याचं शपतपत्रात म्हटलय.
त्यामुळं पोलीसांनी साक्षीदार संजय साडवीलकरची चौकशी करुन १९८५ ते १९८८ या साडवीलकर यानं खरेदी- विक्री केलेल्या गावठी पुस्तलातून काही गुन्हा घडला आहे का, याचा तपास करुन गुन्हा दाखल करावा असं आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
दरम्यान, जुना राजवाडा पोलीसांनी या तक्रार अर्जाचा अभ्यास करुन योग्य ती कारवाई केली जाईल असं सांगितलंय.