इम्युनिटी वाढवणारा रंगीबेरंगी फ्लॉवर

बाजारात येणार रंगीबेरंगी फ्लॉवर 

Updated: Feb 7, 2021, 08:51 PM IST
इम्युनिटी वाढवणारा रंगीबेरंगी फ्लॉवर  title=

निलेश वाघ, झी २४ तास, मनमाड  : आता बातमी रंगीबेरंगी फ्लॉवरची.... आतापर्यंत आपण पांढरा फ्लॉवर पाहिला होता... पण मालेगावातल्या एका शेतक-यानं रंगीबेरंगी फ्लॉवरचं पिक घेतलंय... हे कसं शक्य झालंय.... पाहुया... 

जांभळा फ्लॉवर, पिवळा फ्लॉवर ही काही जादू नव्हे... तर मालेगावातले शेतकरी महेंद्र निकम यांनी असे रंगीबेरंगी फ्लॉवर शेतात उगवलेत. निकम यांनी अमेरिकेत संशोधन झालेल्या या जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या फ्लॉवरची ३० गुंठयांवर लागवड केली. अवघ्या ६०  दिवसांत शेतात हे रंगीबेरंगी फ्लॉवर उगवले. या फ्ल़ॉवरसाठी सेंद्रीय खतांचा वापर करण्यात आलाय. सामान्य फ्ल़ॉवरपेक्षा या जांभळ्या आणि पिवळ्या फ्लॉवरमध्ये जास्त रोगप्रतिकारकक्षमता असल्याचा दावा करण्यात आलाय. 

माझ्या शेतात कोरंटीना आणि व्हॅलेंटिना जातीच्या पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या फुलकोबीचे उत्पादन घेतले आहे. याच्यात पोषकद्रव्ये चांगले आहे ब्रोकोली व सामान्य पूर्वीपेक्षा या जीवनसत्व अधिक असल्याने मी प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे यासाठी मला पंधरा हजार रुपये खर्च आला काढणीपर्यंत जवळपास 20 हजार रुपये खर्च आला आहे त्याची पोषण क्षमता चांगली असल्यामुळे मेट्रो सिटी व मोठ्या मॉलमध्ये त्याला मागणी आहे . साधारणता मला शंभर रुपये किलो भाव अपेक्षित आहे देशात हा पहिलाच प्रयोग असल्याने रंगीबेरंगी फुलावर कोबीला चांगली मागणी मिळेल, असं महेंद्र निकम यांनी सांगितलं. 

आम्ही सुरुवातीला पारंपरिक शेती करायचे त्यानंतर डाळिंब शेवगा पपई अशी उभी पिके घेतली माझा मुलगा प्रयोगशील शेतकरी आहे त्याने प्रथमच आमच्या शेतात रंगीबेरंगी फुल कोबीची शेती केली यशस्वी झाली त्याला आम्ही कुटुंब म्हणून नेहमीच मदत करतो त्याच बरोबर इतर शेतकऱ्यांनाही याबाबतची माहिती देतो यातून पारंपारिक शेतीला फाटा देत शेतीतून उत्पन्न कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो आम्हाला आमच्या मुलाच्या कामाचा अभिमान आहे आम्ही समाधानी आहोत, दिलीप निकम या शेतकऱ्यांनी सांगितलं. 

 महेंद्र निकम यांच्या या रंगीबेरंगी प्रयोगाची राज्याच्या कृषिमंत्र्यांनीही दखल घेतली आहे.  महेंद्र निकम यांचे अभिनंदन करतो मालेगाव तालुक्यातील या युवा शेतकऱ्याने त्यांच्या शेतात पिवळे आणि जांभळ्या रंगाच्या दहा वर्षे यशस्वी उत्पादन घेतले त्यासाठी त्यांच्या सर्व शेतक-यांच्या वतीने अभिनंदन त्यांनी केलेल्या प्रयोग हा शेतकऱ्यांसाठी राज्य पातळीवर दिशादर्शक ठरणार आहे राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने त्यांना पाठबळ दिले जातात या निमित्ताने प्रयोगशील महेंद्र निकम यांना कसे पाठवता येईल यासाठी शासन विचार करेल, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. 

पारंपारिक शेतीबरोबरच असे प्रयोग केले तकर त्याला यश मिळतं. या रंगीबेरंगी फ्ल़ॉवरला शहरं आणि म़ॉलमधून मोठी मागणी आहे.. शेतीतल्या यशाचा हा रंगीबेरंगी मार्ग फायदेशीर ठरतोय.