ठाण्यात क्लस्टर योजना, पोलीस-चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांना १० टक्के राखीव घरे

 किसननगर येथे समूह विकास योजनेच्या (क्लस्टर योजना) पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचे भूमीपूजन झाले.  

Updated: Feb 6, 2020, 05:30 PM IST
ठाण्यात क्लस्टर योजना, पोलीस-चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांना १० टक्के राखीव घरे title=

ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यात क्लस्टर योजनेचं भूमीपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना क्लस्टर योजना महत्त्वाची असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पोलीस कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यांना सर्व योजनेत दहा टक्के घरे देण्याच्या सूचना, यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज किसननगर येथे समूह विकास योजनेच्या (क्लस्टर योजना) पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचे भूमीपूजन झाले. यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. 

किसननगर, कोपरी, राबोडी, हाजुरी, टेकडी बंगला आणि लोकमान्य नगर या सहा भागांत क्‍लस्टर योजना राबवण्यात येणार आहे. यामुळे धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींत जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या लाखो नागरिकांना हक्काचे व सुरक्षित घर मिळणार आहे. ही योजना मार्गी लागण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी येथील समस्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून दिल्या. त्यानंतर ही योजना आता आकार घेत आहे.

शिवसेना ठाणे अजोड नातं आहे सुरवातीपासून. आताचे ठाणे आणि आधीचे ठाणे यात खूप फरक आहे. ठाणे शहराचे रुपडे बदलले आहे. असे असले तरी ठाणेकर साधे आहे. यश प्रत्येकाच्या कर्तृत्वावर आहे. ठाणेकरांनी एकदा आशीर्वाद दिले की ते कायम राहतात. आनंदाच्या क्षणी मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची आठवण येते. माझे कर्तृत्व शून्य हें सर्व शिवसैनिकांचे देणे आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणालेत.

आज ठाण्यात चिकटून इमारती आहेत. क्लस्टरवर आंदोलन झाले. बंद केल्यावर आणि सत्ता मिळाल्यावर बोलती बंद होता कामा नये, लोक जोडे मारतील. अभिमान वाटतो ठाणेकरांचा. पोलीस आणि चतुर्थी क्षेणीच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक योजनेत १० टक्के घर दया. ठाण्याचा विकास बघितल्यावर पोटात नाही दुखत, तर छाती अभिमानाने फुगते. तुम्ही फक्त काय पाहिजे, ते सांगा मी ते देतो. आतापर्यंत सत्ता होतीच आता आव्हाड आल्याने ती अधिक मजबूत झाली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.