नववर्षाच्या पहिल्यादिवशी समुद्रकिनारा केला स्वच्छ

 वसईतील सुरुचीं बाग आणी आजुबाजूचा समुद्र किनारा स्वच्छ केला. जवळपास ४० ते ५० जण या उपक्रमात सहभागी झाले होते. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 1, 2018, 05:22 PM IST
नववर्षाच्या पहिल्यादिवशी समुद्रकिनारा केला स्वच्छ title=

वसई : नवीन वर्षाची सुरुवात बिछान्यात लोळत पडण्यापेक्षा चांगल्या कामानं करावी यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात.  वसईतील जागरुक नागरिक  या सामाजिक  संघटनेनेही असंच चांगलं काम केलंय. 

नववर्षाच्या सकाळी समुद्र किनारा स्वच्छ

नववर्षाच्या सकाळी समुद्र किनारा स्वच्छ केला आहे. वसईतील सुरुचीं बाग आणी आजुबाजूचा समुद्र किनारा स्वच्छ केला. जवळपास ४० ते ५० जण या उपक्रमात सहभागी झाले होते. 

दोन तास साफ़सफ़ाई मोहिम 

दरवरषी संघटनेचे तरुण स्वतःहून पुढाकार घेवून या किना-याची साफ़सफ़ाई करत असतात. ''मिशन सुरुची'' अस या उपक्रमाच नाव आहे.  दोन तास ही साफ़सफ़ाई मोहिम सुरु होती. 

१० ड्रम कचरा जमा

१० ड्रम कचरा जमा करून महापालिका सफ़ाई कर्मचा-यांच्या ताब्यात देण्यात आला आहें. किना-यावर येणा-या पर्यटकांनीही स्वच्छता ठेवावी, असं आवाहन करण्यात आलंय.