मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.  

Updated: Dec 5, 2019, 07:48 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट  title=
संग्रहित छाया

मुंबई / पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्ताने पंतप्रधान मोदी येत आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री भेट घेणार आहेत. मोदी पुण्यात बैठकीसाठी पुण्यात येत आहेत. त्यामुळे राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री ठाकरे हे उद्या पुण्यातील विमानतळावर मोदींच्या स्वागताला जाणार आहेत.

पुण्यात पोलीस महासंचालकांची बैठक होत आहे. त्यासाठी खास पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. मोदी हे उद्या रात्री ९.५० वाजता पुण्यात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे जाणार आहेत. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर प्रथम मुख्यमंत्री ठाकरे त्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे उत्सुकता लागलेली आहे.

राज्यात शिवसेनेने भाजपसोबत असलेली युती तोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, भाजपचे अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची निवडणुकीआधी बंद दाराआड चर्चा झाली होती. शिवसेनेला अडीज वर्षे मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले होते, असा ठाकरे यांच्याकडून दावा करण्यात आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यानंतर युती तुटली आणि राज्यात महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार स्थापन झाले.

या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते, अशी चर्चा होती. मात्र, त्याआधीच मोदी पुण्यात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री जात आहेत. त्यामुळे या भेटीची उत्सुकता संपूर्ण राज्यालाही आहे.