'आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत CM बदलू शकतो'

 आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकतो. शिवसेनेची ताकद अजमावू नका, अशा थेट इशारा भाजपला पर्यायाने मुख्यमंत्र्यांना शिवसेनेने दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 28, 2017, 01:52 PM IST
'आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत CM बदलू शकतो' title=

मुंबई : शिवसेना आणि भाजपमधील संबंध पुन्हा ताणले गेल्याचे दिसत आहेत. सरकारला तीन वर्ष झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तासात मुंबईचा महापौर भाजपचा बसवू शकतो, असे विधान केले होते. याला शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलेय. आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकतो. शिवसेनेची ताकद अजमावू नका, अशा थेट इशारा भाजपला पर्यायाने मुख्यमंत्र्यांना शिवसेनेने दिलाय.

कोल्हापूर येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक संघ अधिवेशनातील परिसंवादानंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी हा इशारा त्यांनी भाजपला दिलाय. मुंबई महापालिकेचा महापौर बदलून भाजपचा करणे अवघड नाही हे विधान मुख्यमंत्रीपदाला शोभणारे नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाबाबत, अच्छे दिन कसे येतील या नियोजनाबाबत आणि सीमाभागातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत बोलावे, असे महाडेश्वर यावेळी म्हणालेत. 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर मुंबईचा महापौर बदलण्याची भाषा करत असतील, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनात आणले तर सात दिवसांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलू शकतात, असा इशारा विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी महापौर बदलण्याची भाषा करण्यापेक्षा राज्याच्या विकासाचा विचार केला, तर बरे होईल. त्यांनी अच्छे दिनचा विचार करावा. मुंबईचा महापौर बदलू असे ते म्हणत असतील, तर त्यांचा हेतू शुद्ध नाही, असे ते म्हणालेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांना पक्षात घेताना कोणता फॉर्म्युला वापरला, असे शिवसेनेला प्रश्‍न विचारले जात आहे. मग भाजपने काय केले. उत्तराखंड, गोवा तसेच इतर राज्यांत दुसर्‍या पक्षातील आमदार पक्षात घेताना कोणता फॉर्म्युला वापरला, हे भाजपने जाहीर केले तर बरे होईल, असे प्रति आव्हानही त्यांनी भाजपला दिले.